मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या रूग्णांचं प्रमाण घटलं आहे. यामुळे मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवली आहे. मुंबईकरांना आता नाईट लाईफचा आनंद घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला वीस हजारांच्यावर गेलेला रुग्णसंख्येचा आकडा, आता हजारापर्यंत आला आहे. सोमवारी मुंबईत एक हजाराहुन कमी रुग्ण आढळले. यापार्श्वभूमीवर निर्बंधात मोठ्या प्रमाणात सूट देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. (मुंबईकरांना मोठा दिलासा, मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा सुरु होणार) 


 


५० टक्के क्षमतेने सुरू राहणार काही गोष्टी 


१. समुद्र किनारे
२. गार्डन
३. पार्क
४. जलतरण तलाव
५. वॉटर पार्क
६. थिम पार्क
७. हॉटेल
८. रेस्टॉरंट


मुंबईतील रात्रीची जमावबंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकाद नाईट लाईफ सुरु होणार आहे. 


याशिवाय टुरिस्ट स्पॉट, आठवडी बाजार, समुद्र किनारे, गार्डन, पार्कही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मैदानी खेळांना क्षमतेच्या २५ टक्केपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. स्विमिंग पुल, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु राहाणार आहे. 


रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार, लग्नकार्यात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० जणांना परवानगी, 


तर भजन, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे.


एकूणच मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपला आनंद पुन्हा मिळणार आहे. असं असलं तरी अजूनही काही निर्बंध कायम आहेत. या निर्बंधांचा पुन्हा एकदा फेब्रुवारीत आढावा घेतला जाईल. त्यानंतर कोरोना निर्बंधाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.